मुंबई

रायगड जिल्हा परिषद शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

CD

रायगड जिल्हा परिषद शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
विद्यार्थ्यांत शिक्षण, समता व सामाजिक जाणिवेचा संदेश
माणगाव, ता. ३ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आडघर येथे ३ जानेवारीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत आणि समाजसुधारणेचे दीपस्तंभ असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक संतोष मोहिते, माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका कांचन ढेपे, सारिका दसवते, माजी ग्रामपंचायत सदस्या पूनम दसवते, श्रावणी दसवते, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नीलिमा टेबे, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपूर्ण भाषणे करण्यात आली. स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, समाजातील विषमता, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष तसेच महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी उचललेली धाडसी पावले यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता, मनोगत आणि छोट्या भाषणांमधूनही सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवला. शाळेतील शिक्षकांनी आपल्या भाषणांतून शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, हा संदेश अधोरेखित केला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, महिलांचे हक्क आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा गौरव करीत आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी समाजाने अधिक सजग व संवेदनशील राहावे, असेही मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

SCROLL FOR NEXT