मुंबई

शेतकरी-ग्राहक थेट संवादाला चालना

CD

टोकावडे, ता. ३ (बातमीदार) : राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद व विक्री व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील म्हसा येथे रविवारी (ता. ४) कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होणार असून, ग्राहकांना दर्जेदार व ताजा शेतमाल थेट खरेदी करता येणार असल्याची माहिती मुरबाड तालुका कृषी अधिकारी संदीप केणे यांनी दिली.
कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन हा एक महत्त्वाचा घटक असून, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले श्रीअन्न (मिलेट्स), फळे, फुले, भाजीपाला, कडधान्ये तसेच विविध अन्नप्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासोबतच कृषी व कृषी संलग्न विभागांचा सक्रिय सहभाग राहणार असून, शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना; तसेच अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित व प्रक्रिया केलेल्या दर्जेदार शेतमालासाठी उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसाठी स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असून, ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून ताजा व दर्जेदार माल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

थेट विक्री साखळीवर भर
कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करणे; तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने या कृषी महोत्सव भरवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य व न्याय्य भाव मिळावा आणि ग्राहकांना उच्च दर्जाचा, ताजा शेतमाल थेट मिळावा, यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

मुख्य उद्देश
कृषीविषयक माहिती व मार्गदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या समजून घेणे. स्थानिक कृषी उत्पादनांना चालना देणे; तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करणे हा या कृषी महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तसेच म्हसा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक व यात्रेकरूंनी या कृषी महोत्सव कार्यक्रमास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT