मुंबई

समन्वयातूनच माणगावचा चेहरामोहरा बदलूया

CD

समन्वयातूनच माणगावचा चेहरामोहरा बदलूया
खासदार सुनील तटकरे यांचे आवाहन
माणगाव, ता. ३ (वार्ताहर) ः आपल्या गावांचा आणि आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास केवळ योजना जाहीर केल्याने होत नाही, तर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी यांच्यातील सुसंवाद, समन्वय आणि प्रामाणिक अंमलबजावणीमुळेच खरा विकास साध्य होतो. त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत जबाबदारीने काम करावे आणि विकासकामांना गती द्यावी, असे भावनिक आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
शुक्रवार, २ जानेवारीला माणगाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित माणगाव तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत माणगाव तालुक्यातील प्रलंबित, बहुप्रतीक्षित तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आणि सखोल आढावा घेण्यात आला. या वेळी बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच माणगाव व इंदापूर बायपास या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर खासदार तटकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. हे काम सध्या वेगाने सुरू असून, जून महिन्यापर्यंत बायपासवरील किमान एकेरी मार्गिका सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मार्ग सुरू झाल्यास माणगाव शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माणगाव नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, गटारे, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांची कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण व्हावीत, यासाठी वन खाते आणि संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करावी, अशा स्पष्ट सूचना खासदार तटकरे यांनी दिल्या. विकासकामांत कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT