मुंबई

जेएनपीएमध्ये नोकरीच्या बहाण्याने गंडा

CD

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : उरण परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने जेएनपीएमध्ये वरिष्ठ पदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवत एका तरुणाकडून तब्बल ३२ लाख उकळून त्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषभ राजेश म्हात्रे (वय २४) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद फहिम अब्दुल कलिम कुरेशी (वय ३४, रा. उलवे) हा सध्या एका खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी तो वाशी येथील एका शिपिंग एजन्सीत काम करत होता, त्यावेळी त्याची ओळख म्हातवली गावात राहणाऱ्या ऋषभ याच्याशी झाली होती. जानेवारी २०२४ मध्ये ऋषभने जेएनपीएमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी जागा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ऋषभने मोहम्मद फहिम याला जेएनपीएमध्ये निर्यात सहाय्यक व्यवस्थापक पदावर नोकरी लावून देण्याचे सांगत त्याच्याकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने विविध बनावट कागदपत्रे तयार करून ते वेगवेगळ्या बनावट ई-मेल आयडीवरून कुरेशी याला पाठवून त्याचा विश्वास संपादन केला. तसेच मार्च ते डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याने कुरेशी यांच्याकडून ३२ लाख आठ हजार रुपये उकळले, मात्र त्यानंतर म्हात्रे याने नोकरी न लावल्याने मोहम्मद फहिम याने कागदपत्रांची तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीत सुरुवात! सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला; आज 2 मोठे IPO बाजारात

Latest Marathi News Live Update : आखाती देशांतील संघर्षाचा परिणाम; तेल कंपन्यांकडून ब्रॅण्डेड पेट्रोलचे दर वाढवले

Jalna News: जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Jalna News: जालना शेतकऱ्यांवर गारपीटचा मोठा फटका; रब्बी पिकांवर संकट

Koyna Dam Water Release : कृष्णाकाठची तहान भागणार! कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; 'या' तारखेला सांगलीत पोहोचणार पाणी

SCROLL FOR NEXT