मुंबई

वाहतूक पोलिसांशी धक्काबुक्की करणारे त्रिकुट ताब्यात

CD

पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : थर्टी-फर्स्ट व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात नाकाबंदीच्या कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांशी तिघा जणांनी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या घटनेत एका वाहतूक पोलिसाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात पनवेल शहर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे.

थर्टी-फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री पनवेलमधील शिवशंभो नाका येथे वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात येत होती. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास, त्याठिकाणी पनवेलच्या करंजाडे भागात राहणारे कल्पेश तुळशीराम जुगे (वय ३०), प्रणय संजय पाटील (२८) आणि तुळशीराम गंगाराम पवार (४३) हे दाखल झाले. या वेळी त्यांच्या नातेवाईकांची कार पोलिसांनी अडवून त्याची तपासणी सुरू केली. त्यामुळे तिघांनी वाहतूक पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रुपांतर थेट भांडणात झाले. त्यांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत पोलिस हवालदार ज्ञानेश्वर पवार हे खाली पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT