मुंबई

नूतन विद्यालयात बालिका दिन साजरा

CD

नूतन विद्यालयात अवतरले सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुले
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय शाळेत सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. तसेच सावित्रीबाईंच्या कष्टामुळे शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रात पुढे आलेल्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व शाळेतील चिमुकल्या करताना दिसल्या.
मुलगी शिकली, प्रगती झाली हा मूलमंत्र लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांच्या नियोजनबद्ध आखणीतून बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या सांस्कृतिक प्रमुख शुभांगी भोसले यांच्या संकल्पनेतून आणि ज्येष्ठ शिक्षक मिताली बोकील, देविदास बगाड, रवींद्र परदेशी यांचे मार्गदर्शन व सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. सावित्रीमाईंच्या त्यागाची जाणीव ठेवून या कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करून सावित्रीमाईंच्या कार्याचा परिचय सुंदर ओवी गाऊन विद्यार्थींनी करून दिला. मी सावित्री बोलतेय यातून मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT