मुंबई

नवी मुंबईत प्रचाराला चांगलीच रंगत

CD

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबईतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार रंग चढू लागला आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक मैदानात उतरल्याने संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सभा, बैठका, पदयात्रा, घराघरांत भेटीगाठी अशा माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा चढाओढीचा प्रयत्न सुरू आहे.

प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेतली असून घोषणाबाजी, फलक, फ्लेक्स, वाहन रॅली यामुळे शहरातील चौकाचौकांत निवडणुकीचे चित्र ठळकपणे दिसू लागले आहे. समाज माध्यमांवरही प्रचाराचा भडिमार सुरू असून व्हिडिओ, पोस्ट आणि थेट संवादातून मतदारांना आकर्षित करण्यावर भर दिला जात आहे.

प्रचारात स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणी-वाहतूक, स्वच्छता, पुनर्वसन, महागाई आणि रोजगार हे मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना उमेदवारांनी भाषणांची धार वाढवली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही ठिकाणी समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीही पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, महिला व तरुणांचा प्रचारात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत असून प्रचारासाठी रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. मतदारांमध्येही उत्सुकता वाढली असून ‘या वेळी कोण बाजी मारणार?’ याबाबत शहरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. नवी मुंबईत प्रचाराला कडाडून रंगत आली असून पुढील काही दिवसांत प्रचाराचा आवाज आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT