मुंबई

लाच घेताना रंगेहाथ पकडले!

CD

लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षकाला अटक
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) ः एका प्रकरणात अटक टाळण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना उल्हासनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाला ठाणे लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदार, त्यांचा मुलगा व पत्नी यांना अटक होऊ नये, तसेच मदत व्हावी, यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय धोंडीराम बिडगर याने २० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांनी सापळा रचून संजय धोंडीराम बिडगर याला रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई उल्हासनगर पोलिस ठाण्यात सुरू आहे. संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, तसेच अपर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांनी पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT