मुंबई

आदित्य, अमित ठाकरे यांची मुंबईत कसोटी

CD

आदित्य, अमित ठाकरे यांची मुंबईत कसोटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या खांद्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रचाराची धुराही त्यांच्यावर आहे. महायुतीशी त्यांना सामना करावा लागणार आहे. ही निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी कसोटी ठरणार आहे.

मुंबई महापालिका निवडणूक ही अटीतटीची होणार असून आज उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. कधी नव्हे इतके बंडखोर या वेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धोका आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत नाराजांची मनधरणी करण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना नाकीनऊ आले. अजूनही काही ठिकाणी अपक्षांचे आव्हान कायम आहे. शिवसेना आणि मनसेही यातून सुटलेले नाहीत.

शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे या पक्षांतही बंडखोरी दिसून आली. याला सामोरे जाताना दोन्ही भावांची चांगलीच दमछाक होणार आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची कार्यशाळा शुक्रवारी (ता. २) आदित्य आणि अमित ठाकरे यांनी घेतली. या कार्यशाळेत त्यांनी प्रचारात कोणते मुद्दे असतील आणि ते प्रभावीपणे कसे मांडायचे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी निवडणुकीसाठी काही घोषणा जाहीर केल्या असून विकासाचा रोडमॅपही सादर केला.
---
भवितव्‍य ठरवणारी निवडणूक
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खरी लढत होणार आहे. भाजप आणि शिवसेना महायुतीशी टक्कर देणे अमित आणि आदित्य यांना तितके सोपे नाही; मात्र दोघेही निवडणुकीसाठी सज्ज आहेत. मुंबई महापालिका निवडणूक दोन भावांचे भवितव्य ठरवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, फिरकी घेत म्हणायला लावलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

SCROLL FOR NEXT