‘दशावतार’ची ऑस्करच्या दिशेने झेप
मुंबई, ता. ३ : मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या वर्षी विशेष ठसा उमटवणाऱ्या ‘दशावतार’ या चित्रपटाने आता जागतिक पातळीवरही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोकणातील लोकपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि समकालीन आशय यांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवरही त्याने धुमाकूळ घातला. आता याच चित्रपटाची ऑस्कर अर्थात अकॅडमी पुरस्काराच्या प्रक्रियेत निवड झाल्याची बातमी मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची ठरत आहे.
‘दशावतार’ची ऑस्करच्या मुख्य गटातील यादीत निवड झाल्याची माहिती दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी समाजमाध्यमातून दिली. हा चित्रपट अकॅडमी स्क्रिनिंग रूममध्ये दाखवला जाणार आहे. हजारो चित्रपटांमधून निवड झालेल्या सुमारे १५०हून अधिक चित्रपटांमध्ये ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अकॅडमी स्क्रिनिंग रूममध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या यशाबद्दल भावना व्यक्त करताना दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, ‘जिंकणं-हरणं दुय्यम असलं तरी जागतिक स्तरावर मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणे हेच सर्वात मोठे समाधान आहे. या निवडीमुळे मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्षमपणे उभा राहू शकतो, याची पुन्हा एकदा प्रचिती येते.’ ‘दशावतार’मध्ये दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर आणि अभिनय बेर्डे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.