गोवेलीत पाणी तपासणी प्रयोगशाळेला आग
आरोग्य उपकेंद्रासही झळ, लाखाेंचे नुकसान
टिटवाळा, ता. ३ (वार्ताहर) : गोवेली येथील उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला मध्यरात्री आग लागली. ही आग इतकी तीव्र होती, की तिचे लोण आरोग्य उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पोहोचले. या आगीत पाणी तपासणी प्रयोगशाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर आरोग्य उपकेंद्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला आणि पोलिस चौकीच्या अगदी मागील बाजूस असलेल्या जुन्या शासकीय इमारतीत ग्रामपंचायत कार्यालय, पाणी तपासणी प्रयोगशाळा, आरोग्य विभागाचे उपकेंद्र, आधार कार्ड केंद्र आदी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत; मात्र या संकुलाच्या आजूबाजूला असलेल्या पडक्या इमारतींमुळे परिसरात तळीरामांचा मुक्त वावर असतो. अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर पोलिस चौकी असतानाही येथे बिनधास्त गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. मध्यरात्री कोणीतरी आजूबाजूच्या गवत व झाडाझुडपांना आग लावली असावी आणि तीच आग पसरत जाऊन प्रथम पाणी तपासणी प्रयोगशाळेने भीषण रूप धारण केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
या आगीत पाणी तपासणीसाठी वापरण्यात येणारी महागडी रासायनिक द्रव्ये, ड्रम, कॅन, संगणक, टेबल, खुर्च्या, कपाटे, पंखे तसेच अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे खाक झाली आहेत. आरोग्य उपकेंद्रातील २०१० ते २०२० या कालावधीतील सर्व रुग्णनोंदी व प्रशासकीय कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या छताचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.