भाजपच्या मनुवादी वृत्ती उघड
काॅँग्रेसची ‘वर्षा बेगम’ उल्लेखावरून टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : भाजपच्या ट्राेल आर्मीने मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांचा केलेला अपमान हा भाजपचा जातीयवादी चेहरा दाखवणारा प्रकार आहे. मागासवर्गीय समाजातील एक महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते ही मनुवाद्यांची खरी पोटदुखी आहे. हे केवळ संविधानाने शक्य झाले असून, भाजपची मनुस्मृती असती तर ते शक्य झाले नसते, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
भाजपच्या ट्रोल गँगने बौद्ध धर्मीय असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना एका व्हिडिओद्वारे ‘वर्षा बेगम’ संबोधून त्यांचा धर्म बदलवून एका गरीब मुस्लिम व्यक्तीला त्या पक्षाचे तिकीट देत आहेत, असे दाखवून त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. खरेतर सत्तेच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचे नाव घेणाऱ्या भाजपचा हा हिंदू धर्माच्या दुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा वसुधैव कुटुंबकम् हे तत्त्वज्ञान जगाला सांगणारा धर्म आहे. या धर्माला असहिष्णू व दुष्ट ठरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हा हिंदू धर्माचा अवमान आहे, असे सावंत म्हणाले.
बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीची हत्या
नगरपालिकेनंतर आता महापालिका निवडणुकीतही भाजप महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचे सत्र सुरू आहे, हे लोकशाहीवरील मोठे संकट आहे. संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे. ती संधी नाकरली जात आहे. भाजप साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण करून हा प्रकार करीत आहे. कारस्थानी पद्धतीने, दबावाने बिनविरोध निवडणुका केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाची भूमिका भाजपला मदत करणारी आहे. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारेच संविधानावर घाला घालण्याचे काम करीत आहेत. कुलाब्यातील प्रकार लोकशाहीची थट्टा करणारा आहे. निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करीत आहे काय, असा सवाल सावंत यांनी विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.