मुंबई

दापचरी जकात नाक्यावर कसरत

CD

दापचरी नाक्यावर कसरत
कलाकुसरीच्या दुकानांमुळे अपघातांचा धोका
कासा, ता. ४ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर महिनाभरापूर्वी नियंत्रण सुटलेल्या एका कंटेनरला अपघात झाला होता. या घटनेमुळे येथील कलाकुसरीच्या वस्तू विक्रीची दुकाने अपघाताला निमित्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
दापचरी जकात नाक्यावर गुजरातहून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. मुंबईकडे जाणारी लहान प्रवासी वाहने सरळ मार्गाने जातात. या ठिकाणी गुजरात, राजस्थानमधील चिनी मातीच्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंची दुकाने असल्याने अनेक प्रवासी वाहने अचानक थांबतात. काही वाहनचालक दुकानांकडे पाहताना पुढील वाहनांवर धडक देत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी सिमेंटचे अडथळे ठेवले असून वाहनांचा वेग कमी होतो; मात्र रस्त्यालगत असलेल्या दुकानांकडे प्रवाशांचे लक्ष गेल्याने वाहतूक विस्कळित होत आहे.
-------------------------------
दापचरी जकात नाक्यावरून प्रवासी वाहने मोठ्या संख्येने जातात. येथील दुकानांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका वाढला आहे.
- विपुल राऊत, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT