मुंबई

कोणत्याही कारणास्तव उपचार नाकारू नयेत

CD

कोणत्याही कारणास्तव उपचार नाकारू नयेत
आरोग्यमंत्री आबिटकर यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायास, मोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, की सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत, या उद्देशाने शासन जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवत आहे. या योजना शासनाच्या नियमानुसारच राबविल्या गेल्या पाहिजेत; मात्र रेशन कार्डाची मूळ प्रत उपलब्ध नसणे किंवा इतर किरकोळ कारणांमुळे रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवले जाऊ नये. अशा वेळी डिजिटल रेशन कार्ड व्हेरिफिकेशनचा वापर करून रुग्णांना तातडीने उपचार देण्यास प्राधान्य देण्यात यावे. रुग्णांना कागदपत्रे, मंजुरी प्रक्रिया किंवा तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास होऊ नये, यासाठी रुग्णालयांतील समन्वयकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समन्वयकांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आवश्यक मार्गदर्शन करून उपचार प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT