मुंबई

धारावीतील रस्त्यांवरील वाहतूककोंडीत वाढ

CD

धारावीतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत वाढ
धारावी, ता. ४ (बातमीदार) : धारावी परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, स्थानिक नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अंतर्गत रस्त्यांवर सातत्याने होणाऱ्या वाहतूक जाममुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात असून, रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल नूतनीकरणासाठी गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने या पुलावरील संपूर्ण वाहतूक धारावीमार्गे वळवण्यात आली आहे. परिणामी ९० फुटी रस्ता, ६० फुटी रस्ता, धारावी मुख्य रस्ता, संत रोहिदास मार्ग, संत कक्कया मार्ग तसेच धारावी क्रॉस रोडवर वाहनांची अचानक वाढ झाल्याने सतत वाहतूककोंडी निर्माण होत आहे.
हलकी तसेच जड वाहने मोठ्या प्रमाणावर अरुंद रस्त्यांवरून जात असल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. एका मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी पादचाऱ्यांना पाच मिनिटांपर्यंत वेळ लागत असून, वाहनचालकांनाही काही सेकंदांच्या प्रवासासाठी अनेक मिनिटे अडकून पडावे लागत आहे.
रस्त्यावर होणारे बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांची गर्दी तसेच अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते अधिकच अरुंद झाले असून, त्यामुळे वाहने अडकून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेकदा अंत्ययात्रांनाही या वाहतूककोंडीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. धारावीतील ९० फुटी आणि ६० फुटी रस्ते हे सायन रुग्णालय, वाडिया, केईएम, एमजी आणि नायर रुग्णालयाकडे जाणारे प्रमुख मार्ग असल्याने या मार्गांवरून सातत्याने रुग्णवाहिका ये-जा करतात. मात्र वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा रुग्णवाहिका अडकून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे वाहतूक विभागाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT