मुंबई

चिंचणी गावाचा कारभार चव्हाट्यावर

CD

चिंचणी गावाचा कारभार चव्हाट्यावर
ग्रामसेविका मनमानी करीत असल्याची सरपंचाची तक्रार
पालघर, ता. ४ ः डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप सरपंच, सदस्यांनी केला आहे. याबाबतची लेखी तक्रार डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्याने चिंचणी गावाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे,
चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका प्रतीक्षा करबट यांनी पदभार स्वीकारल्यापासून कार्यकारिणीला विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवल्याचा आरोप सरपंच, सदस्यांनी केला आहे. तशी तक्रार डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्तींकडे केली आहे. ग्रामपंचायतीचे पूर्ण दफ्तर दिले नसल्याचे तसेच दफ्तर गहाळ असल्याची माहिती ग्रामसेवकाने ग्रामसभेत दिल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
------------------------
नोंदवलेले आक्षेप
ग्रामपंचायतीचे कामकाज वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. तसेच मासिक सभेच्या अजेंड्यावर सरपंचांची परवानगीशिवाय सभा घेणे, शासकीय सुट्टीच्या दिवशी सभेच्या अजेंडा वाटप करणे, असे प्रकार होत असून सरपंचाच्या सही व परवानगीशिवाय घरपट्टी आकारली जात असून प्रतीक्षा करबट यांनी ३० डिसेंबरची घेतलेली मासिक सभा नियमबाह्य असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
--------------------------
चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका, नागरिकांच्या तसेच ग्रामपंचायत सदस्यांची दिशाभूल करून गावात संभ्रम निर्माण करीत आहे. तसेच संवेदनशील ठिकाणचे खोटे दाखले, खोट्या जन्ममृत्यूच्या नोंदी, खोट्या घरपट्टी देत आहेत.
- मेघा शिंगडे, सरपंच, चिंचणी
------------------------------
चिंचणी ग्रामसेवक पदभार घेतल्याचे पत्र प्राप्त आहे. कागदपत्रे किंवा दप्तर नसेल तर लेखी कळवणे आवश्यक होते. तक्रारीच्या पत्रानुसार लेखी खुलासा ग्रामसेविकेकडून मागवले आहे.
- पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT