मुंबई

खैरेखुर्द उर्दू शाळेत फूड फेस्टिव्हल उत्साहात

CD

खैरे खुर्द उर्दू शाळेत फूड फेस्टिव्हल उत्साहात
रोहा, ता. ४ (बातमीदार) : चणेरा परिसरातील खैरे खुर्द येथील राजीव गांधी प्राथमिक उर्दू शाळेत फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोहा पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून व्यवसाय कौशल्य, व्यवहारज्ञान व स्वावलंबनाचे धडे प्रत्यक्ष कृतीतून सादर केले. शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान देण्याचा शाळेचा प्रयत्न या उपक्रमातून ठळकपणे दिसून आला.
या वेळी पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी शिस्त, शिक्षण व समाजभान यांचे महत्त्व विशद करीत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत खैरे खुर्दचे सरपंच मुजम्मील गीते, पत्रकार सागर जैन, सचिन ठाकूर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण कोंडे, मुख्याध्यापिका सुमैया मुल्ला, चेअरमन सादिक खोत, सचिव असगर मुकादम, सल्लागार बशीर धनसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अब्दुल हमीद गीते, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT