मुंबई

मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवलीत जनजागृती मोहीम

CD

कल्याण-डोंबिवलीत मतदान जनजागृती मोहीम
कल्याण, ता. ४ (बातमीदार) : नागरिकांमध्ये मतदानाची जनजागृती करण्यासाठी कल्याणकर जागरूक नागरिक टीम व स्वच्छ भारत अभियान टीम यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उल्हासनगरमधील श्रीराम चौक, कल्याणतील चक्की नाका ते डोंबिवलीतील घारडा सर्कलपर्यंत राबविण्यात आली.
नियोजित मार्गावर ठिकठिकाणी स्वयंसेवकांनी नागरिकांशी थेट संवाद साधून मतदानाच्या दिवशी सर्वात प्रथम मतदान करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना त्यांच्या मतदान हक्काची जाणीव करून देण्यात आली. कल्याण-डोंबिवली परिसरात आगामी काळातही विविध ठिकाणी अशा जनजागृती मोहिमा राबवून मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत संस्थेसह, महाराष्ट्र पोलिस आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्याचा संदेश या मोहिमेतून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT