मुंबई

तिळसे येथे महावितरणच्या तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

CD

विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
ग्रामस्थाचा महावितरणवर निष्काळजीचा आरोप
वाडा, ता. ४ (बातमीदार) ः तिळसे गावात महावितरणच्या तुटलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून गणपत लक्ष्मण दळवी (वय ४५, रा. दळवी पाडा, तिळसे) याचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ४) सकाळी ही घटना घडली. यामुळे परिसरात महावितरणच्या कामावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपत दळवी हे सकाळी वाडा येथे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले. दळवी पाडा ते तिळसे थांब्यादरम्यान रस्त्याने चालत असताना तुटून शेतातील रस्त्यावर पडलेली महावितरणची मुख्य विद्युत वाहिनीच्या ते संपर्कात आले. या मुख्य वाहिनीचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना जोरदार धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. याबाबत महावितरणचे कर्मचारी तसेच पोलिस ठाण्याला तातडीने माहिती देण्यात आली. वाडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नुकसानभरपाई द्या
या घटनेमागे महावितरणच्या निष्काळजीमुळेच तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तुटलेली विद्युत वाहिनी रस्त्यावर पडूनही वेळेवर दुरुस्ती न करण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप मृताचा पुतण्या सुमीत दळवी यांनी केला आहे. या प्रकरणास जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच मृत गणपत दळवी यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, गॅस टंचाईचा जालन्यातील स्टील उद्योगालाही फटका...

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT