मुंबई

बंडखोरी आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा शिवसेना-भाजप पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार

CD

‘ती’ यादी पक्षश्रेष्ठींकडे
कल्याण-डोंबिवली महायुतीतील बंडखोरी
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : महापालिका निवडणुकीत बंडखोरी आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी करण्यात आली आहे. यासंदर्भात महायुतीतील शिवसेना शिंदे गट-भाजपचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी माहिती शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट-भाजप एकत्र निवडणूक लढत आहेत. निवडणुकीत अनेक जण इच्छुक होते. त्यामध्ये बहुतांश इच्छूकांना शिवसेना- भाजप नेत्यांनी अर्ज मागे घ्यायला लावला; परंतु अद्याप काही बंडखोर आहेत. त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही. त्यासोबतच असेही काही लोक आहेत जे पक्षात राहून पक्षविरोधी काम करीत आहेत, अशा लोकांची एक यादी तयार करून शिवसेना- भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आली आहे. काही तासांत त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी केले आहे. शिवसेना- भाजपमध्ये कल्याण-डोंबिवलीत ५५ ते ६० लोक असे आहेत जे बंडखोरी करून निवडणूक लढत आहे. तर काही लोक पक्षात राहून पक्षविरोधी काम करीत आहेत. यामुळे बंडखोरी आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर दोन्ही पक्ष कडक कारवाई करणार, हे निश्चित मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, तणाव वाढला!

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT