मुंबई

मिरा भाईंदरमध्ये भाजप व एमआयएमची युती

CD

मिरा-भाईंदरमध्ये भाजप-एमआयएमची युती!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा पलटवार

भाईंदर, ता. ४ (बातमीदार)ः मिरा-भाईंदर महापालिकेसाठी काँग्रेस व शिवसेनेची युती झाली असल्याचा आरोप शनिवारी (ता. ३) भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपची एमआयएमशी युती झाली असल्याचा आरोप परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाजपकडून एमआयएमच्या उमेदवारांना आर्थिक रसदही पुरवली जात असल्याचे सरनाईक यांनी रविवारी (ता. ४) सांगितले.

मिरा भाईंदरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. मुंबई व ठाण्यात भाजप-शिवसेनेत युती झालेली असताना मिरा-भाईंदरमध्ये मात्र ती होऊ शकली नाही. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. दोघेही महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत आहेत. यामुळे दोन्ही पक्षांतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेने काँग्रेसच्या काही उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केलेले नाही, तर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार अचानक मागे घेतले. त्या ठिकाणी काँग्रेस शिवसेनेला मदत करीत आहे, असा आरोप मेहता यांनी केला होता.

आर्थिक मदत
त्याला प्रत्युत्तर देतान सरनाईक म्हणाले, की भाजपने नयानगर येथील प्रभाग ९ व २२मध्ये उमेदवारच उतरवलेले नाहीत. या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांना आर्थिक मदत भाजपकडून केली जात आहे. शिवसेना ८१ जागांवर निवडणूक लढवत आहे. काही ठिकाणी शिवसेनेची थेट लढत काँग्रेससोबत आहे. असे असताना शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी नरेंद्र मेहता खोटे आरोप करीत आहेत, अशी टीका सरनाईक यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT