मुंबई

ठाण्यात बिनविरोधासाठी दबाव

CD

ठाण्यात बिनविरोधासाठी दबाव
महाविकास आघाडीचे ‘लाव रे तो व्हिडिओ’
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता बिनविरोध निवडीवरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेण्यात आल्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, असा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला असून ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत या संपूर्ण प्रकरणाची चित्रफीत मोबाईलवरून त्यांनी दाखवली.
मनसेचे अविनाश जाधव व ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत पोलिस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवून उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडले जात असल्याचा आरोप केला. एक उमेदवार फॉर्म भरल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यासोबत थेट एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर गेला. त्यानंतर काही वेळातच त्याने अर्ज मागे घेतला. ही वेळ आणि घटनाक्रम जुळवून पाहावा, असे जाधव म्हणाले.

पोलिसांच्या दबावाखाली निवडणूक?
ही निवडणूक पैसा आणि पोलिसांच्या दबावाखाली लढवली जात आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहोत, असा इशाराही जाधव यांनी दिला. तसेच वागळे विभागातील दोन सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमागे प्रशासनिक हातभार लागल्याचा आरोप करण्यात आला.

निवडणूक अधिकाऱ्यांवरही आक्षेप
फॉर्म प्रदर्शनात वेळेची चूक, चुकीचे फॉर्म आणि त्यानंतर बिनविरोध निवडी. या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाही, अशी मागणी मनसेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा आणि दबावाला बळी पडणाऱ्यांचा ‘पाहुणचार केला जाईल’, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिल्याने या प्रकरणाला आणखी राजकीय धार चढली आहे.

गंभीर आरोप
पक्षाचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्या आणि नंतर तो माघारी घेणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पैशांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करीत अर्ज माघारी घेऊन ही निवडणूक बिनविरोध करणे म्हणजे मतदारांशी गद्दारी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ठाकरे गटाचे हे तीन उमेदवार होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निवेदन मनसेचे अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...

T20 World Cup नंतरही भारतात अडकलेले वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेचे अखेर मायदेशी परतणार; ICC कडून तिकीटांची सोय

Darpan Award for Padma Shri Dr. Smita Kolhe: मेळघाटातील सेवाकार्यासाठी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना परभणीत दर्पण पुरस्कार

SCROLL FOR NEXT