मुंबई

टोकावडे येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती

CD

टोकावडे येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती
टोकावडे ता. ५ (बातमीदार) ः महाराष्ट्र पोलिस रायझिंग डे सप्ताहानिमित्ताने टोकावडे पोलिस ठाण्याच्या वतीने जनसेवा शिक्षण संस्थेच्या शारदा विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम सोमवारी (ता. ५) पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नशामुक्ती, स्व-संरक्षण, सायबर गुन्हे, वाहतूक नियम व सुरक्षितता, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, डायल ११२ सेवा आणि पोलिस ठाण्याची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल व मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलिस कर्मचारी, विद्यालयाचे प्राचार्य काशिनाथ गोडांबे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शितलकुमार नाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कायद्याची माहिती देत समाजात जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे आवाहन केले.
यावेळी पोलिस बॅण्ड सादर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनच्या SRH Leeds ने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

Whatsapp New Feature : तुमच्या पालकांना कळणार तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये काय करताय; आलं Parental Control फीचर, कसं वापरायचं पाहा

SCROLL FOR NEXT