मुंबई

श्रीवर्धनामध्ये भाजपमधून स्‍वबळाचा नारा

CD

श्रीवर्धनामध्ये भाजपमधून स्‍वबळाचा नारा
नगरपरिषद निकालांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये आत्‍मविश्वास
श्रीवर्धन, ता. ५ (बातमीदार) ः श्रीवर्धन नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक निकालांनी तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असतानाच, आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात स्वबळावर लढण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बापवन येथे पार पडलेल्या भाजपच्या निर्धार सभेत कार्यकर्त्यांनी स्‍वबळाचा नारा पक्ष नेतृत्वास दिला आहे. या सभेमुळे श्रीवर्धनच्या राजकारणात भाजपची आगामी दिशा स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे.
श्रीवर्धन भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप सालदूरकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (ता. २) आयोजित या बैठकीस जिल्हा सरचिटणीस व श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषद निवडणुकीतील अनुभव, यश-अपयश, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका यावर यावेळी सखोल चर्चा झाली. तालुक्यातील प्रत्येक गावातील बूथ प्रमुख, गाव अध्यक्ष तसेच सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितीमधून भाजपची संघटनात्मक ताकद व कार्यकर्त्यांमधील उत्साह स्पष्टपणे दिसून आला. सभेत बोलताना तालुका भाजप अध्यक्ष आशुतोष पाटील यांनी स्‍वबळाची ठाम भूमिका मांडली. नगरपरिषदेच्या निकालांनी भाजप कार्यकर्त्यांची खरी ताकद स्पष्ट केली आहे. आता भाजप कोणाच्या आधारावर उभा राहणार नाही. जिद्द, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील आणि जिंकल्या जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार टाळ्यांच्या गजरात समर्थन मिळाले. अध्यक्षीय मनोगतात प्रशांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांना दिलासा दिला. नगरपरिषद निकालानंतर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्णपणे रास्त आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबतची भूमिका वरिष्ठ पातळीवर नक्कीच मांडली जाईल. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास व विश्वास कुठल्याही परिस्थितीत तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीला तालुका चिटणीस उमेश अडखळे, कोशाध्यक्ष गजानन निंबारे, उपाध्यक्ष उदय पाटील, ॲड. जयदीप तांबुटकर, आराठी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सुदेश पालेकर, गण अध्यक्ष मंगेश खैरे, बागमांडला गण अध्यक्ष तुषार विचारे यांच्यासह अनेक बूथ अध्यक्ष व गाव अध्यक्ष उपस्थित होते. सर्वांनी एकमताने स्वबळाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.
................
स्वबळाची रणनीती ठरतेय निर्णायक
नगरपरिषद निवडणुकानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढलेला असून, त्याचे स्पष्ट प्रतिबिंब या निर्धार सभेत पाहायला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका युतीपेक्षा स्वबळाच्या रणनीतीवर लढवण्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. याचा तालुक्यातील एकूणच राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

Simple Home Remedies: रोज रात्री जेवणानंतर पोट फुगतंय? सतत गॅसचा त्रास होतोय? आजपासून करा 'हे' सोपे उपाय

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

AI Toys Ban : लहान मुलांचे 'बोलके खेळणे' ठरू शकते खतरनाक! सरकारने घेतली मोठी अ‍ॅक्शन; काय मार्केटमधून गायब होतील सगळे गॅजेट्स?

SCROLL FOR NEXT