मुंबई

फळ बाजारात भीषण आग

CD

वाशी एपीएमसीमधील फळबाजारात आग

जुईनगर, ता. ५ (बातमीदार) : मुंबई बाजार समितीमधील फळबाजारातील निर्यात इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामादरम्यान उडालेली एक ठिणगी तळमजल्यावरील दुकानांमध्ये साठवून ठेवलेल्या प्लॅस्टिक कॅरेटवर पडून आग भडकली.
आगीची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अतिक्रमण, पॅसेजमध्ये साठवलेले कॅरेट, पुठ्ठे व ज्वलनशील साहित्य, तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे अग्निशमन व बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एका गाळ्यात जवळपास दोन हजार प्लॅस्टिक कॅरेटची साठवणूक करण्यात आली होती. या इमारतीत यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या होत्या. अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण तसेच अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT