मुंबई

कळव्यात निवडणुकीत कौटुंबिक चुरस

CD

कळव्यात निवडणुकीत कौटुंबिक चुरस
कळवा, ता. ५ (बातमीदार) ः यंदाची महापालिका निवडणूक कळव्यात चुरशीची ठरणार असून, विशेषतः प्रभाग क्रमांक २३ आणि २४ मध्ये कौटुंबिक लढत पाहायला मिळत आहे. एकाच घरातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्याखाली आमने-सामने आल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष या लढतींकडे लागले आहे.
प्रभाग क्रमांक २३ ड मधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले मंदार केणी यंदा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात याच पॅनेलमध्ये प्रभाग २३ ब मधून त्यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका प्रमिला केणी रिंगणात उतरल्या आहेत. प्रमिला केणी या शरद पवार गटाकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. घरामध्ये आई-मुलाचे नाते असले, तरी निवडणुकीच्या मैदानात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत.
तर, प्रभाग क्रमांक २४ मध्येही शिवसेनेच्या माजी नगरसेविका आरती गायकवाड या निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांना त्यांचीच बहीण दीक्षा गायकवाड यांनी रिपब्लिकन सेनेकडून २३ अ मधून आव्हान दिले आहे.
दरम्यान, दोन्ही प्रभागांत सध्या सामाजिक माध्यम आणि घरोघरी जाऊन प्रचाराचा धडाका सुरू आहे. मात्र, मतदारांना नेमका कोणाला आणि कोणत्या चिन्हावर मत द्यावे, हे पटवून देताना उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारील याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT