मुंबई

मानवी साखळी द्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

CD

मानवी साखळीद्वारे विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती
कल्याणमधील विविध शाळांतील विद्यार्थी झाले होते सहभागी
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : मतदानासाठी मंगळवारी (ता. ६) कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून जनजागृती केली. कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसरात बिर्ला कॉलेज रोड आणि खडकपाडा रोड या दोन्ही दिशेने विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली असून हातातील मतदान जनजागृतीचे फलक, बॅनर लक्ष वेधत होते. यावेळी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात आयुक्त अभिनव गोयल, स्वीपचे नोडल अधिकारी संजय जाधव, विजय सरकटे, आरएसपी शिक्षक, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
राज्य निवडणूक आयोगामार्फत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामुळे हे विद्यार्थी घरी जाऊन आपल्या पालकांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतील, अशी माहिती अभिनव गोयल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शार्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT