मुंबई

क्रेडिट कार्डद्वारे मेडिसिनचे बील देणे पडले महागात

CD

सव्वानऊ लाखांचा महिलेला गंडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ऑनलाईन मागवलेल्या औषधांचे बिल क्रेडिट कार्डद्वारे देणे नौपाड्यातील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. एका क्रेडिट कार्डद्वारे पैसे ट्रान्सफर झाले नाही म्हणून दुसरे दिले आणि दोन्हीमधून त्या दोन्हीमधून भामट्याने तब्बल सव्वानऊ लाखांहून अधिक रक्कम काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नौपाड्यातील ५९ वर्षीय महिला या गेल्या एक वर्षांपासून ठाण्यात भाड्याने राहत आहेत. शनिवारी (ता. ३) त्यांनी ऑनलाईन औषधे मागवले होते. त्याचे बिल देण्यासाठी त्यांनी एका बँकेचे क्रेडिट कार्ड स्वाईप करण्याकरीता दिले. परंतु, पैसे ट्रान्सफर झाले नाही म्हणून तक्रारदार यांनी दुसऱ्या बँकेचे क्रेडिट कार्ड दिले. ते कार्ड स्वाईप करून त्याचे बिल त्यांना दिले. त्यानंतर त्या भामट्याने त्यानंतर, औषध घेऊन झाल्यानतंर महिलने बँकेचे मोबाईल ॲप ओपन करून बघितले असता त्यात सहा लाख एक हजार १२१ रुपये ९४ पैसे इतकी रक्कम खर्च झालेली दिसून आली. तक्रारदार यांनी तात्काळ बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर पहिल्या क्रेडिट कार्डवर देखील अपुरे शिल्लक दाखवत असल्याने पुन्हा त्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून विचारणा केली असता यावरून एकूण तीन लाख २७ हजार ६७५ रूपये इतकी रक्कम खर्च झालेली दिसून येत असल्याचे सांगितले. यामुळे तक्रारदार यांनी तात्काळ त्या बँकेचेही केडिट कार्ड ब्लॉक केले. अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT