मुंबई

महागाई, बेरोजगारीविरोधात एल्गार

CD

महागाई, बेरोजगारीविरोधात एल्गार
पालघरमध्ये १९ जानेवारीला जिल्हाव्यापी लॉन्ग मार्च
तलासरी, ता. ७ (बातमीदार)ः महागाई, बेरोजगारी, जमिनीचे प्रश्न आणि जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणांविरोधात मार्क्सवादी आणि ठाणे-पालघर जिल्हा कमिटीच्यावतीने सोमवारी (ता.१९) पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा व्यापी लॉन्ग मार्च काढण्यात येणार आहे. चारोटी नाक्याहून सकाळी अकरा वाजता हा लॉन्ग मार्च सुरू होणार आहे.
भाजप सरकारांच्या धोरणांमुळे ग्रामीण व शहरी भागातील सामान्य जनता महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य, उपासमार, रोगराई आणि भूमिहीनतेच्या गर्तेत लोटली गेली आहे. दुसरीकडे देशातील अमाप संपत्ती अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, जिंदाल यांसारख्या मोजक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. जनतेमध्ये वाढत असलेला असंतोष दडपण्यासाठी एकीकडे हुकूमशाही पावले उचलली जात असून, दुसरीकडे धर्म व जातीच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केला. तलासरीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातील पत्रकार परिषद त्यांनी केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारांच्या धोरणांवर तीव्र टीका केली.
----------------------------------------
नोंदवलेले आक्षेप
- ठाणे, पालघर जिल्ह्यांत पाणीसाठे असताना शेकडो गावात पिण्याचे तसेच शेतीसाठी पाणी मिळत नाही.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा खर्च कमी करून ग्रामीण गरीबांना रोजगार व वेतनापासून वंचित.
- वीज खासगीकरणाच्या नावाखाली स्मार्ट मीटर योजना जबरदस्तीने राबवून जनतेवर भरमसाठ वीजबिलांचा बोजा.
- नव्या श्रमसंहितेमुळे कामगारांचे अधिकार, किमान वेतनाचे संरक्षण आणि कामगार हक्क धोक्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT