मुंबई

डहाणू, पालघर, वाड्याच्या विकासाला गती

CD

डहाणू, पालघर, वाड्याच्या विकासाला गती
नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला, कामकाजाला सुरूवात
पालघर, ता. ७ ः पालघर नगरपरिषदेत शिवसेनेचे नगराध्यक्ष उत्तम घरत, तर डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजू माच्छी तर वाडा नगरपंचायतीत भाजपच्या रिमा गंधे यांनी यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासाला गती आली आहे.
जव्हार नगरपरिषदेमध्ये भाजपच्या पूजा उदावंत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र त्यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी नगरपरिषदांमध्ये विकास, नागरी समस्यांकडे लक्ष घालणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर पदभार स्वीकारताना शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावीत,राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.)जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, नवनियुक्त नगरसेवक, महिला-पुरुष पदाधिकारी, युवसेना आदी उपस्थित होते. तर वाड्यात नगराध्यक्ष गंधे यांच्यासह खा. डॉ. हेमंत सावरा,जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, आमदार हरिश्चंद्र भोये, आ.शांताराम मोरे यांची उपस्थिती होती.
--------------------------
पाच गटनेत्यांची निवड
डहाणू नगरपरिषदेत भाजपने जगदीश राजपूत यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे. तर पालघरमध्ये भाजपचे भावानंद संखे यांना गटनेतेपद दिले आहे. पालघरमध्ये शिवसेनेच्या डॉ.उज्वला काळे पक्षाने गटनेत्या केले आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपने रामचंद्र भोईर तर शिंदे शिवसेनेने उमेश लोखंडे यांना गटनेटेपद दिले आहे. जव्हारमध्ये अजूनही गटनेतेपदाची लवकरच घोषणा होणार असल्याचे पक्षामार्फत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT