मुंबई

ठाण्यातून तीन मुले बेपत्ता

CD

ठाण्यातून तीन मुले बेपत्ता; एका मुलीसह दोन मुलांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : शहरातील वागळे इस्टेट आणि घोडबंदर रोड या परिसरातून चोवीस तासात तीन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये बेबी केअरमध्ये कामाला असलेल्या १६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मानपाडा येथे राहणारी १६ वर्षीय मुलगी सोमवारी (ता. ५) बेबी केअर येथे कामावर जाते सांगून गेली, ती रात्री घरी परत आलीच नाही. म्हणून तिच्या पालकांनी कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता ती सकाळी कामावर आलीच नसल्याचे समोर आले. तिला कोणीतरी पळवून नेल्याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, वागळे इस्टेट येथे राहणारे १० आणि १३ वर्षीय दोन मुले सोमवारी (ता. ५) क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. ते सायंकाळी झाले तरी परतले नाही म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून न आल्याने वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना गुणांसोबत संस्कारही द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

SCROLL FOR NEXT