मुंबई

रुग्णसेवेला बळकटी

CD

रुग्णसेवेला बळकटी
पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होण्याचे संकेत

मनोर, ता. ७ (बातमीदार) : पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवेला बळकटी मिळणार आहे.
पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील डोंगराळ भागातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी पारगाव परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी केली जात होती. स्थनिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून मागणीचा पाठपुरावा केला जात होता. पाठपुराव्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी, पालघर यांच्या माध्यमातून पारगाव आरोग्य केंद्रास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली होती. नऊ महिन्यांच्या कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी एक कोटी ४३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सहा महिन्यांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन असताना तीन महिन्यांचा उशीर होऊन नऊ महिन्यांत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करून आरोग्य सेवा सुरू करण्याचे नियोजन केले जात असल्यामुळे पारगाव पंचक्रोशीतील रुग्ण आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातून पारगाव पंचक्रोशीतील गाव-पाड्यातील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
पालघर जिल्ह्यात पारगाव, धुंदलवाडी आणि धानिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती पायलट प्रोजेक्टअंतर्गत प्री कास्ट मटेरियलचा वापर करून बांधल्या जात आहेत.

या सुविधा उपलब्ध
नवीन इमारतीत वैद्यकीय कक्ष, औषध वितरण कक्ष, स्त्री व पुरुष रुग्ण कक्ष, प्रयोगशाळा, आपत्कालीन कक्ष तसेच कॅन्टीन आदी सुविधा आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


खर्चाची बचत
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी सहा ते सात कोटी रुपये बांधकाम खर्च अपेक्षित असताना प्री कास्ट मटेरियल वापरून एक ते दीड कोटी रुपयांमध्ये इमारत बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पाच ते सहा कोटी रुपयांची बचत झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगितले. तसेच कर्मचारी भरती प्रक्रिया मंजुरी स्तरावर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

फोटो - 656

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT