मुंबई

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार

CD

आदिवासी तरुणीला तीन लाखांना विकले
श्रमजीवी संघटनेकडून प्रकार उघडकीस; गुन्हा दाखल
वाडा, ता. ७ (बातमीदार) ः तालुक्यातील गारगाव येथील एका २० वर्षीय तरुणीला तीन लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेने हा प्रकार उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गायधनी (वय ३१), सुमन गायधनी, वाघमारे नावाची व्यक्ती व रघुनाथ दुधवडे अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील गारगाव येथील एका २० वर्षीय तरुणीचा विवाह वडगाव पिंगळा येथील सुनील गायधनी याच्याशी ९ मे २०२४ मध्ये झाला. प्रारंभी त्यांचा संसार चांगला चालला होता त्यानंतर घरामध्ये वाद सुरू झाले. यातून त्या तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करणे, शेजारी लोकांशी बोलून न देणे असे प्रकार नवरा व सासूने सुरू केले. तीन महिन्यांनंतर ही तरुणी माहेरी आली. एक महिना माहेरी राहिल्यानंतर नवऱ्याचे नातेवाईक तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले. ती पुन्हा सासरी गेली. त्यानंतर नवरा, सासू तिच्याशी नेहमीच भांडू लागले. ती गरोदर असताना नवऱ्याने तिला पट्ट्याने मारहाण केली होती. तू आमच्या घरी राहू नकोस, तुझे लग्न करण्यासाठी वाघमारे व रघुनाथ दुधवडे नावाच्या व्यक्तीला तीन लाख रुपये दिले होते. आम्हाला ते पैसे परत दे व येथून निघून जा, असे नेहमीच सासरची मंडळी बोलत असत.
त्यानंतर २० जून २०२५ मध्ये तरुणीने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिला माहेरी घेऊन गेले. ६ जानेवारीला नवरा, सासू, नणंद आदी नातेवाईक तिला वडगाव येथे घेऊन जाण्यासाठी आले; मात्र सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिने सासरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर तू नाही आलीस तरी चालेल, आमचा मुलगा आम्हाला दे, असे बोलू लागले. दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, तालुकाध्यक्ष भरत जाधव, सुजाता पारधी, मीरा टोकरे या कार्यकर्त्यांनी तरुणीला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठून पती, सासू व इतरांवर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा अधिक तपास जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. मेहेर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT