मुंबई

यंदा ऐरोली नाट्यगृहांची तिसरी घंटा वाजणार

CD

यंदा ऐरोली नाट्यगृहांची तिसरी घंटा वाजणार
बारा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार; नाट्यरसिकांमध्ये उत्‍सुकता
वाशी, ता. ११ (बातमीदार) : ऐरोलीतील नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी असून, तब्बल बारा वर्षांपासून रखडलेले ऐरोली नाट्यगृह अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. ऐरोली सेक्टर- ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर नवी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या या नाट्यगृहाची इमारत आता पूर्णपणे उभी राहिली असून अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या तीन महिन्यांत सर्व कामे पूर्ण होऊन एप्रिल महिन्यापर्यंत नाट्यगृह रसिकांच्या सेवेत खुले होणार आहे. त्यामुळे याच नूतन वर्षात ऐरोली नाट्यगृहांची ‘तिसरी घंटा’ वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईचा विकास सिडकोमार्फत सुरू होताना वाशी, बेलापूर, नेरूळ व तुर्भे हे नोड विकसित करण्यात आले. नागरिकांच्या मनोरंजनासाठी वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृह उभारण्यात आले. मात्र शहराचा विस्तार दिघ्यापर्यंत झाल्यानंतर कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली परिसरातील नागरिकांसाठी स्वतंत्र नाट्यगृहाची मागणी सातत्याने होत होती. ही गरज लक्षात घेऊन २४ जुलै २०१३ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या नाट्यगृहास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रारंभी २० ऑगस्ट २०१४ रोजी मे. महावीर रोड्स अ‍ॅण्ड इन्फ्रा. प्रा. लि. यांना सुमारे ५४ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र आर्थिक कारणांमुळे ठेकेदाराने काम सुरू न केल्याने तब्बल सहा वर्षे प्रकल्प रखडला. त्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून जुलै २०२१ मध्ये सुपर कन्स्ट्रक्शन यांना काम देण्यात आले.
.................
७० कोटी रुपये खर्च
सध्या सुमारे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून चार मजली भव्य इमारत उभी राहिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. ऐरोली नाट्यगृह कार्यान्वित झाल्यानंतर दिघा, ऐरोली व घणसोली परिसरातील नाट्यरसिकांची वाशीपर्यंतची फरफट थांबणार असून सांस्कृतिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. नूतन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नाट्यगृह पूर्ण होईल, असा विश्वास महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.
..................
चौकट :
नाट्यगृहाची रचन
१ ले तळघर: कार पार्किंग
२ रे तळघर: कार पार्किंग
तळमजला: तिकीट घर, प्रसाधनगृह, रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार
पहिला मजला: सौंदर्य प्रसाधनगृह, अपंगांसाठी सुविधा, उपहारगृह
दुसरा मजला: ग्रीन रूम, प्रशासकीय दालन, बहुउद्देशीय सभागृह
तिसरा मजला: अधिकारी कक्ष, अतिथीगृह, उपहारगृह
चौथा मजला: विशेष अतिथीगृह, अधिकारी कक्ष
................
चौकट :
आसन व्यवस्था
ऑर्केस्ट्रा आसन व्यवस्था - ४७४
दिव्यांगांसाठी आसन - ४
बाल्कनी आसन व्यवस्था - ३८२
एकूण आसन क्षमता - ८६०
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT