मुंबई

सीटबेल्ट लावणाऱ्या वाहनचालकांचा सन्मान

CD

सीटबेल्ट लावणाऱ्या वाहनचालकांचा सन्मान
सीवूड्स वाहतूक पोलिसांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सीवूड्स वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सीटबेल्ट परिधान करून नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या वाहनचालकांचा थेट रस्त्यावर गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
सामान्यतः वाहतूक पोलिस म्हणजे दंड, चलान आणि कारवाई अशी प्रतिमा नागरिकांच्या मनात असते. मात्र दंड नव्हे, तर सन्मान, या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रस्त्यावर काही काळ वेगळे आणि सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे कौतुक करण्यात आल्याने अनेक चालक सुखद आश्चर्य व्यक्त करत होते. या वेळी वाहनचालकांना भविष्यातही वाहन चालवताना सीटबेल्टचा नियमित वापर करून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. सीटबेल्टचा वापर केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीवित सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचेही पोलिसांकडून समजावून सांगण्यात आले. पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. यासंदर्भात बोलताना सीवूड्स वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून ती नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. अशा सकारात्मक उपक्रमांच्या माध्यमातून नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांमध्ये दंडाच्या भीतीऐवजी नियम पाळण्याची जाणीव आणि सन्मानाची भावना निर्माण झाली. अनेक वाहनचालकांनी सीवूड्स वाहतूक पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत, अशाच उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT