मुंबई

निवडणूक अधिकारांच्या कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात

CD

निवडणूक अधिकारांच्या कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात
- मनसेच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने पाठवला अहवाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : महापालिका निवडणुकीत उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप असलेल्या दोन निवडणूक अधिकाऱ्यांबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्यामुळे या वादग्रस्त प्रकरणातील कारवाईचा निर्णय आता थेट आयोगाच्या कोर्टात गेला आहे.
प्रभाग क्रमांक १८ आणि प्रभाग ५ मधील निवडणूक प्रक्रियेत पक्षपाती भूमिका घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्यनिवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल करत न्यायालयात याचिकाही सादर केली होती.
कारवाई न झाल्याने मंगळवारी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौरव राव यांची भेट घेतली. २४ तासांत कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारण्याचा इशाराही देण्यात आला होता. या भेटीत आयुक्तांनी प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती आयोगाकडे सादर करण्याचे आश्वासन दिले होते.
त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी पालिका प्रशासनाने संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांबाबतचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला. आता या प्रकरणात पुढील निर्णय आयोगाकडून घेतला जाणार असून, मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हालचाल केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT