मुंबई

डोंबिवलीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन

CD

डोंबिवलीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ ः राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १०) ते सोमवारी (ता. १२) अशी तीन दिवस ही व्याख्यानमाला होणार असून आयुर्वेदाचार्य रामचंद्र गोडबोले यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
शनिवारी विज्ञान प्रसारक डॉ. जयंत वसंत जोशी यांचे ‘वंदेमातरम्’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे प्रणेते जयवंत कोंडविलकर यांचे ‘धुमसता ईशान्य भारत’ या विषयावर व्याख्यान होईल. तर, सोमवारी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. छत्तीसगडमधील बस्तर भागातील वंचित आदिवासी समाजासाठी वैद्यकीय सेवा पुरविणारे रामचंद्र गोडबोले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ही व्याख्यानमाला स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे होणार असून पहिले दोन दिवस सायंकाळी सात वाजता तर पुरस्कार समारंभ सायंकाळी ६.३० वाजता होईल. तसेच, तीनही दिवस ठाणे जिल्ह्यातील पहिली नाविन्यपूर्ण मॅथ्स एक्झिबिशन देखील आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT