मुंबई

अभिनेते भाऊ कदम पालघर भेटीवर

CD

अभिनेते भाऊ कदम पालघर भेटीवर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष दौरा
पालघर, ता.८(बातमीदार)ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी हास्यकलाकार, नाट्य व चित्रपट अभिनेते भाऊ कदम जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत. या अभियानाअंतर्गत ग्रामस्थांमध्ये जनजागृतीबरोबर ग्रामविकास प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने थेट संवाद साधणार आहेत.
पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत चहाडे, ग्रामपंचायत उमरोळी, डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत घोलवड तसेच वाडा तालुक्यातील ग्रामपंचायत हमरापूर येथे दौऱ्याअंतर्गत १३ जानेवारी रोजी भेटी देण्यात येणार आहेत. यावेळी भाऊ कदम विनोदी शैलीतून अनुभवाधारित मांडणी व संवादाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील विविध उपक्रम, ग्रामपंचायतींची भूमिका, लोकसहभागाचे महत्त्व तसेच विकासकामांची माहिती प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणार आहेत. या भेटींमुळे ग्रामपंचायतींमध्ये राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल तसेच अभियानाबाबत जनजागृती वाढून ग्रामस्थांमध्ये विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
-----------------------
ग्रामविकासाला गती
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास प्रक्रियेला गती मिळत असून, अशा संवादात्मक, जनजागृतीपर सादरीकरणांमुळे ग्रामपंचायती अधिक सक्षम व लोकाभिमुख होतील, असा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी-कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.

Regards,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT