मुंबई

उधवा-संजान महामार्गाला विरोध

CD

उधवा-संजान महामार्गाला विरोध
मोबदला, भूसंपादनाठी शेतकरी आक्रमक
तलासरी, ता. ८ (बातमीदार)ः उधवा ते संजान राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम तलासरी तालुक्यात सुरू आहे. पण भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नसताना खासगी मालकीच्या जमिनीतून रस्ता काढला जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले आहे.
उधवा ते संजानदरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत सध्या महामार्गाचे काँक्रीटीकरण खासगी कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. पण हा रस्ता शेतकऱ्यांच्या मालकी जमिनीतून जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नसताना काम केले जात असल्याने गुरुवारी (ता. ८) राज्य मार्ग क्रमांक ७३ किमी ४५/८०० ते ९९/४०० अंतरावर या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला उधवा, जांबूनपाडा (सागरसेत) परिसरात शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.
-----------------------------------------
नोंदवलेले आक्षेप
- कामासाठी आलेल्या ५० हून अधिक लोकांकडून दादागिरी, धमकी दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जात आहे. ही आमची मालकी जमीन असून, जोपर्यंत प्रशासन प्रत्यक्ष येत नाही.
- कागदपत्रे स्पष्ट करीत नाहीत तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने रोड मॅप, भूसंपादन कागदपत्रे, फेरमोजणी अहवाल, कायदेशीर आदेश स्पष्ट करावेत, अशी मागणी होत आहे.
-----------------------------------------
कोणताही लेखी आदेश, भूसंपादनाचा पुरावा किंवा मोबदला न देता काम सुरू करण्यात आले आहे. आधी योग्य मोबदला द्या, अधिकृत कागदपत्रे दाखवा; त्यानंतरच काम सुरू करा.
- सीताराम सापटा, शेतकरी
------------------------------------------
प्रशासनाने दिलेल्या महामार्ग क्रमांक ७३ नकाशा मोजमापानुसार रस्त्याचे काम करीत आहोत. आक्षेप असेल अशा शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदवावा. आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय करीत नाही.
- गुलशन मीणा, प्रकल्प व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT