मुंबई

सत्तेसाठी भाजपाला एमआएम चालतो.

CD

सत्तेसाठी भाजपला एमआएम चालतो!
हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना तातडीने पक्षातून बडतर्फ करण्यात आले, काँग्रेसने कारवाई केली; पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले. यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पक्षाशी युती करीत असून अकोटमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी भाजपाने युती केली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
जालना येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजप व शिंदेसेनेविरोधात लढला व १२ नगरसेवक निवडून आले; पण भाजपने अंबरनाथ विकास आघाडी करण्यासाठी पक्षाच्या लेटर हेडवर पत्र जारी केले आहे. काँग्रेसने तत्काळ कारवाई केली; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणतीही कारवाई केली नाही, केवळ एक विधान करून ते मोकळे झाले. भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक आहे, अशी अभद्र युती करताना तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात घेताना भाजपला लाज वाटायला पाहिजे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त झाला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. भाजपला विलासराव देशमुख यांची आठवण नव्हे; तर शिव, शाहू, फुले व आंबेडकर यांचे विचारही पुसायचे आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, गॅस टंचाईचा जालन्यातील स्टील उद्योगालाही फटका...

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT