मुंबई

उमेदवारांना प्रचाराच्या जाहिरातींसाठी परवानगी अनिवार्य

CD

पनवेल, ता. ८ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता प्रचाराची रणधुमाळी उडत आहे. यानिमित्ताने डिजिटल प्रचार करणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने काही बंधने घातली आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार आता कोणत्याही उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जाहिरात करताना महापालिकेच्या माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांनी डिजिटल माध्यमांमध्ये जाहिरात प्रसारणाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली आहे. डिजिटल माध्यमांमध्ये केल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी संबंधित उमेदवार व पक्षांना माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडे अर्ज करावा लागणार आहे. या अर्जानुसार परवानगी घेतल्यावरच जाहिरात प्रसारित करण्याची मुभा दिली जाणार आहे. उमेदवारांनी जाहिरात प्रसारित करावयाच्या तारखेपूर्वी किमान पाच दिवस आधी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र आणि जाहिरातीच्या दोन प्रती पेनड्राइव्हमध्ये साक्षांकित केलेल्या दोन मुद्रित प्रतींसह जमा कराव्या लागतील. या अर्जाचे नमुने महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कार्यालयात उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचा साठा किती? इंडियन ऑइलने इंधन टंचाईच्या प्रश्नावर दिलं स्पष्टीकरण

Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत? निवेदिता सराफ यांनी काय दिलं उत्तर? वाचून वाटेल कौतुक

US India Oil Deal: रशियन तेल खरेदी करू शकता, अमेरिकेनं भारताला दिली ३० दिवसांची सूट

SCROLL FOR NEXT