मुंबई

विषारी धुरात गुदमरतेय गोवंडी

CD

विषारी धुरात गुदमरतेय गोवंडी
डम्पिंग ग्राउंडचे विषारी सावट; रहिवाशांचा मोकळ्या श्वासासाठी संघर्ष
भाग्यश्री भुवड, जीवन तांबे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गोवंडी, देवनार परिसरातील डम्‍पिंग ग्राउंड, सिमेंट कंपनी, एसएमएस कंपनी तसेच अन्य रासायनिक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे या भागात राहणाऱ्या हजारो रहिवाशांचे आरोग्य संकटात आले आहे. थेट डम्‍पिंग ग्राउंडवरून ‘सकाळ’ने स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
उपनगरातील सर्वात मोठे डम्‍पिंग ग्राउंड गोवंडी येथे आहे. याच परिसरात बायो-केमिकल प्रकल्प आणि सिमेंटसह अन्य रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. डम्‍पिंग ग्राउंडमधून निर्माण होणारे सल्फर डायऑक्साइडसारखे अत्यंत घातक वायू हवेत मिसळत असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार जडत आहेत. दमा, छातीत दुखणे, डोळे जळजळणे, हृदय व फुप्फुसांचे विकार, कर्करोग, किडनी व यकृताचे आजार, त्वचारोग, उच्च रक्तदाब, टीबी तसेच डेंगी, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. लहान मुलांनाही टीबी आणि दम्याचा त्रास वाढला आहे.
घराची दारे-खिडक्या बंद ठेवल्या तरीही घरात दुर्गंधी येते. खिडक्यांवर मच्छरांचा सुळसुळाट असतो. या ठिकाणी मोकळा श्वास घेणेही अशक्य झाले आहे, अशी व्यथा नागरिकांनी मांडल्या. त्‍यामुळे लोक आजारांना बळी पडत असतानाही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. नियमांना बगल देऊन सायंकाळी ६ नंतरही प्लांट सुरू असतात. २४ तास विषारी धूर निघत राहतो.
डम्‍पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकल्यानंतर वाहने मागे घेताना काही वाहनचालकांकडून बेदरकारपणे महिला आणि मुलांना चिरडल्याच्या घटना घडत आहे. पोलिसात दाद मागतो; मात्र ते तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

प्रदूषणाचा विळखा
प्रदूषणाचा त्रास केवळ गोवंडीपुरता मर्यादित नसून देवनार, शिवाजीनगर, चेंबूर, मानखुर्द आणि ट्रॉम्बे परिसरातील नागरिकांनाही सोसावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करून, रास्ता रोको व आंदोलने करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सरकार आमच्यासारख्या गोरगरिबांची दखल घेत नाही, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

काय आहेत मागण्या?
- डम्‍पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद किंवा अन्यत्र हलवा
- तातडीची आणि शाश्वत उपाययोजना
- प्रदूषणामुळे आजारी पडलेल्यांना नुकसानभरपाई
- प्रभावी कचरा व्यवस्थापन
- प्रदूषण नियंत्रण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या

धूळ व विषारी वायूंमुळे दमा व त्वचारोगांसारखे आजार होत आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची यंत्रणा अपुरी व निष्क्रिय आहे.
- अब्दुल गफार शेख, स्थानिक रहिवासी

शाळेत जाताना प्रचंड धूळ उडते आणि वायूचा तीव्र वास येतो. त्यामुळे डोकेदुखी व अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही.
- साईशा डोके, विद्यार्थिनी

प्रदूषणामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका प्रशासन सर्रासपणे दुलक्ष करीत आहे. गर्दुल्‍ल्‍यांची संख्या वाढली आहे. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
- बाळासाहेब केंजले, स्‍थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT