मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ जानेवारी रोजी भव्य सभा

CD

महायुतीचा निर्विवाद विजय ः उपाध्ये
मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी नालासोपाऱ्यात सभा

विरार, ता. ८ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यभरात सुरू असलेल्या विकासकामांना सामान्य जनतेने पसंती दिली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. आता वसई-विरारमध्येही विकासाच्या बाजूने नागरिक मतदान करून वसई-विरारमध्ये भाजप-शिवसेना-श्रमजीवी, आग्रिसेना महायुतीचा निर्विवाद विजय होईल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कालकेले.

वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (ता.९) नालासोपारा पूर्व येथील सेंट्रल पार्क गार्डन येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांची उपस्थित होती.

भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक व्यक्ती मतदान करणार आहे. मिनी विधानसभा निवडणूकीचा आता दुसरा टप्पा असून, पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या निवडणूकीत भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. आता २९ महापालिकेतही भाजपला यश मिळेल, असे भाकीत केशव उपाध्ये यांनी केले. मुंबईसह राज्यभरात विकासाची कामे सुरू आहेत. शहरांचा कायापालट होत आहे. भाजपा हा केवळ विकासाचा कार्यक्रम राबवित आहे. त्याला सामान्य नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, भाजपवर नागरिकांचा विश्वास वाढत आहे, असे प्रतिपादन केशव उपाध्ये यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

'कुत्र्याने माझ्या मांडीला चावा घेतला आणि...' मुळशी पॅटर्नमधल्या पिट्या भाईने सांगितली भयंकर घटना, म्हणाला...'माझ्याजागी जर...'

SCROLL FOR NEXT