मुंबई

वांद्रे पूर्व येथील मोझम अली मीर यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून

CD

इच्छुक उमेदवारांची न्यायालयात धाव
शुक्रवारी सुनावणी निश्चित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वेगवेगळ्या कारणास्तव फेटाळलेले अर्ज पुन्हा दाखल करून घेण्यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांवर शुक्रवारी (ता. ९) उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
विभाग क्रमांक १ ते २२७चे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका आयुक्तांनी या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांस्तव फेटाळले होते. तथापि, सत्ताधारी पक्षाला खूश करण्यासाठी हे अर्ज फेटाळल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत अत्यंत कमी असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली तेव्हा न्यायालयाने याचिका तातडीच्या सुनावणीसाठी शुक्रवारी सूचीबद्ध केल्या.
...
आरोप असे...
- जिल्हा निवडणूक अधिकारी आणि विभाग क्रमांक १ ते २२७ च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य व विरोधी पक्षांच्या असंख्य उमेदवारांचे उमेदवारी अर्ज किरकोळ, अति-तांत्रिक आणि अवैधानिक कारणांवरून फेटाळल्याचा आरोप करीत वांद्रे पूर्व येथील मोझम अली मीर यांनी ही जनहित याचिका केली आहे.
- हा राज्य निवडणूक आयोगाचे (एसईसी) घटनात्मक अधिकार रद्द करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा थेट प्रयत्न असल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. 
- महापालिका ही केवळ एक अंमलबजावणी करणारी संस्था आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अटी रद्द करण्याचा, बदलण्याचा किंवा त्यात भर घालण्याचा अधिकार नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT