मुंबई

आवाज नसलेल्यांच्या मागे ठामपणे उभे रहा

CD

प्रश्न विचारण्याचे धाडस करा!
न्या. रेवती मोहिते-डेरे यांचे वकिलांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई उच्च न्यायालयाचा वारसा जपण्यासाठी सत्याधाऱ्यांना, अधिकारशाहांना प्रश्न विचारण्याचे धाडस करा, आवाज नसलेल्यांसाठी ठामपणे उभे राहा, असे आवाहन मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी गुरुवारी (ता. ८) उपस्थित वकिलांना केले.
केंद्र सरकारने १ जानेवारीला न्या. डेरे यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीची अधिसूचना काढली होती. त्या पार्श्वभूमीवर न्या. डेरे यांचा निरोप समारंभ उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ४६ क्रमांकाच्या न्यायदालनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. वकील म्हणून संविधानाप्रती न्याय आणि सत्याचे पुरस्कर्ते होण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे. म्हणून निर्भयपणे बोला आणि ठोसपणे बाजू मांडा. योग्य असलेल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. तुमची सचोटी आणि धैर्य समाजावर चिरस्थायी प्रभाव टाकेल, असा सल्लाही न्या. डेरे यांनी उपस्थितांना दिला. न्यायाला आकार देण्याची शक्ती तुमच्या हातात आहे. केवळ पक्षकारांचे प्रतिनिधित्व न करता ध्येयांचे समर्थन करा. तुमचा आवाज दडपशाही आणि स्वातंत्र्यामध्ये फरक घडवू शकतो. मुंबई उच्च न्यायालयाचा गौरवशाली वारसा नेहमीप्रमाणे उंच ठेवा, असेही न्या. मोहिते-डेरे यांनी सांगितले.
----
माणूस म्हणून समृद्ध झाले!
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मुंबई उच्च न्यायालयाचे अढळ स्थान आहे. एक न्यायमूर्ती म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही येथेच समृद्ध झाले. न्यायमूर्तींचे काम केवळ कायद्याचा अर्थ लावणे नसून न्यायव्यवस्थेवर लोकांनी ठेवलेला विश्वास कायम राखणे असल्याचेही मला याच वास्तूने शिकवले. असंख्य सुनावण्यांमध्ये, न्यायाच्या शोधात येणाऱ्यांनी आमच्यावर ठेवलेली आशा आणि विश्वास महत्त्वाची होती. न्यायदान ही केवळ बौद्धिक प्रक्रिया नाही, तर ती संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि दूरदृष्टीची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli BJP vs Congress politics : सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसचा गणिमी कावा; मिरजमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वच एकवटले

Shivam Dube: साधेपणा pro-max! वर्ल्डकप जिंकून देणारा शिवम दुबे चक्क रेल्वेने घरी, नेटकऱ्यांनी केला सलाम

Latest Marathi News Live Update : विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Chandoli Forest Leopard Sighting : सांगलीच्या चांदोलीत वाघांनंतर आता 'या' दुर्मिळ पाहुण्याची एन्ट्री; सफारीदरम्यान पर्यटकांना मिळालं खास सरप्राईज!

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

SCROLL FOR NEXT