मुंबई

निवडणूक प्रक्रियेत  हस्तक्षेपास उच्च न्यायालयाचा नकार

CD

निवडणूक प्रक्रियेत  हस्तक्षेपास उच्च न्यायालयाचा नकार
उमेदवारांचे प्रयत्न अपयशी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज विविध कारणांस्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले. त्याप्रकरणी उमेदवारी अर्ज पुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करणारी, उमेदवारांनी दाखल केलेली याचिका शुक्रवारी (ता. ९) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या निर्णयामुळे निवडणूक लढण्याचा उमेदवारांचा अंतिम प्रयत्नही अपयशी ठरला.
मुंबई महापालिकेची निवडणूक १५ डिसेंबरला जाहीर झाली असून पुढील आठवड्यात निवडणूक पार पडणार आहे. विविध कारणास्तव फेटाळण्यात आलेल्या या उमेदवारांचे अर्ज पुन्हा दाखल करून घेण्याची मागणी मान्य करणे हे शेवटच्या क्षणी निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासारखे असल्याचेही मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने जनहित याचिका फेटाळताना नमूद केले. याचिकाकर्ते जनहित याचिकेद्वारे अशी मागणी करू शकत नाहीत, हा महापालिकेच्या वकिलांनी उपस्थित केलेला मुद्दाही न्यायालयाने याचिका फेटाळताना ग्राह्य धरला.
मुंबईतील विभाग क्रमांक १ ते २२७ चे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका आयुक्तांनी या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांस्तव फेटाळले. सत्ताधारी पक्षाला खूश करण्यासाठी अर्ज फेटाळल्याचा संशय व्यक्त करून वांद्रेस्थित व्यावसायिक मोझम अली मीर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. उमेदवारी अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT