मुंबई

भररस्त्यात सशस्त्र दरोडा घालणाऱ्यांचा सूत्रधार अटकेत

CD

मुंबई, ता. ९ ः भरस्त्यात सशस्त्र लूटमार करणाऱ्या सराईत आरोपीस माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील नेरळ बाजारपेठ येथे वेशांतर करून बेड्या ठोकल्या. कैलाश ऊर्फ केपी (वय ५४) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पिस्तूल, पाच जिवंत काडतुसांसह सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कैलाश सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, धुळे येथे ३५ गुन्ह्यांची नोंद आहे. नागपाडा पोलिसांकडून मकोकानुसार दाखल गुन्ह्यात त्याचा शोध सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी पी डिमेलो मार्गावर ब्लू गेटजवळ स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या तक्रारदाराला तीन ते चार जणांनी रोखले. गोळीबार करून त्याच्याकडील ४७.२७ लाख किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून आरोपी फरार झाले. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी चौघांना अटक केली; मात्र सूत्रधार कैलाश सापडत नव्हता. पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी विशेष पथक स्थापन करून शोध सुरू केला. अनेक राज्यांत पथकाने शोधाशोध केल्यावर तो आता पकडला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT