मुंबई

पान ३ पट्टा

CD

मेहवश बेंजीला दुहेरी सुवर्णपदक

विरार (बातमीदार) : विरार येथील विवा कॉलेज ऑफ लॉ या महाविद्यालयातील मेहवश बेंजी अब्दुल रेहमान मेहजबीन या विद्यार्थीनीने मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ एल. एल. बी. या शाखेतून ९.२० जीसीपीआय गुण मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल “एन. एम. वाडिया सुवर्णपदक” व “स्व. कानुभाई एम. पटेल सुवर्णपदक” हे फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर सभागृहात पार पडणाऱ्या विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. हा दीक्षांत समारंभ विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा व अभिमानास्पद क्षण ठरणार असून, तिच्या मेहनतीला मिळालेली ही गौरवपूर्ण दाद निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ट्रस्टच्या सचिव अपर्णा ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
--------------------------------------
ओवी मोरेला थ्रोबॉल स्पर्धेत रौप्यपदक

विरार (बातमीदार) : विरारच्या रुस्तमजी इंटरनॅशनल कॅम्ब्रिज शाळेच्या ओवी मोरे हिने तिच्या संघासह ३३ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर थ्रोबॉल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ओवीने वाराणसी येथे झालेल्या थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत संघासह रौप्यपदक मिळवले. संघाची कर्णधार म्हणून तिने उत्कृष्ट खेळ, शिस्त आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले. या यशामागे शाळेने मुलींना दिलेले क्रीडा प्रशिक्षक मयुरेश कमलाकर यांचे मार्गदर्शन, तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक सागर वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला सराव महत्त्वाचा ठरला आहे. या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्य, शिक्षकवर्ग व पालकांनी ओवीचे अभिनंदन केले आहे.
----------------------------------------------
५७ वर्षानंतर बालमित्र पुन्हा एकत्र

कासा (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील चिंचणी गावातील कानजी धरमशी शाळेच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन तब्बल ५७ वर्षांनंतर भंडारदरा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. ७ व ८ जानेवारी रोजी हे दोन दिवसीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सुलोचना हरचेकर, ज्योती नाईक, सुधा चुरी, प्रमोदिनी चौधरी, नीलम राऊत, अरुण पाटील व विजय म्हात्रे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. आज बहुतेकजण आजी-आजोबांच्या भूमिकेत असतानाही सर्वांना एकत्र आणण्याचे श्रेय विजय म्हात्रे यांना यावेळी देण्यात आले.

---------------------------------------
निराधार महिलांना मायेची ऊब

मोखाडा ( बातमीदार ) : मोखाड्यातील सूर्यमाळ गावातील जेष्ठ नागरिक, निराधार महिला व गरजवंतांना १५० ब्लँकेट, खाद्य तेल, साखर व फळे यांचे वाटप बॉम्बे नागनाथ फॅरस मॅटल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. ऐन हिवाळ्यात ब्लँकेट मिळाल्याने, जेष्ठांना व निराधार महिलांना मायेची ऊब मिळाली आहे. सूर्यमाळ गावात येऊन आम्हाला आनंद झाला. आम्ही यापुढे नेहमीच मोखाडा तालुक्यात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करू असे मनोगत ट्रस्टचे चेअरमन भवरलाल जैन यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश लायन जैन व इतर मान्यवरही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

'काका, पास घरी राहिलाय; बाबांना फोन करा ते पैसे देतील'! पाचवीतील मुलाची विनंती, तरीही बस कंडक्टर महामार्गावर उतरवलं, नंतर...

BMC Election: निवडणूक प्रक्रियेवर १०५ ड्रोनद्वारे नजर, संवेदनशील प्रभागांवर २४ तास लक्ष

IND vs NZ, Video: हर्षित राणाच्या 'गेम चेंजर' विकेट्स! भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी करणाऱ्या सलामीवीरांना पाहा कसं केलं आऊट

Bigg Boss Marathi 6 Live Update: किती दिवस असणार 'बिग बॉस मराठी ६' चा हा सिझन? सतीश राजवाडे म्हणाले-

SCROLL FOR NEXT