मुंबई

घातक सांडपाण्यामुळे चिंता

CD

घातक सांडपाण्यामुळे चिंता
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रकार
बोईसर, ता. १० (वार्ताहर) ः तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या जागेत केमिकलयुक्त पाणी साचल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या पाण्यामुळे पर्यावरण, शेती आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रक्रियेविना घातक सांडपाणी सोडण्याचे अनेक प्रकार झाले आहेत. यापूर्वी सगीता केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर घातक केमिकलयुक्त पाणी परिसरात आढळल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई केली होती. तसेच तपासादरम्यान रासायनिक पाण्यात अत्यंत धोकादायक घटक आढळून आल्याने कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच आता पुन्हा एका
मोकळ्या भूखंडावर लाल रंगाचे केमिकलयुक्त पाणी साचलेले आहे. हे पाणी परिसरातील ओढे, नाले तसेच भूगर्भजलात मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केमिकलयुक्त पाणी कोणत्या कंपनीचे आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------
कंपनीने कामकाजात सर्व आवश्यक खबरदारी घेतली आहे. पाणी खालून किंवा इतर कोणत्या ठिकाणाहून येत असेल, याची माहिती नाही.
- गोपाल पाटील, मुख्य व्यवस्थापक, सगीता केमिकल प्रायव्हेट लिमिटेड
------------------------------
संबंधित अधिकाऱ्याला घटनास्थळावर पाठवण्यात येईल. तसेच चौकशीअंती दोषी कंपनीवर कारवाई केली जाईल.
- राजू वसावे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर १
-----------------------------------
कारखान्याच्या पाठीमागील परिसरात केमिकलयुक्त पाणी साचलेले आहे. यामुळे पर्यावरण, नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.
- हेमंत साळुंखे, जनसेना सामाजिक संस्था, जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

BMC Election: ना प्रचाराचा धुरळा, ना आरोपांच्या फैरी! काय चाललंय मुंबईतील मतदारांच्या मनात?

Indian Railway: ब्रिटिश पोशाखाला अलविदा! आता भारतीय रेल्वेमध्ये गणवेशात येणार आधुनिक टच, अश्विन वैष्णव यांची घोषणा

'तान्हाजी द अनसंग वॉरियर'चा येणार सिक्वेल ? अजयच्या त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

SCROLL FOR NEXT