मुंबई

बदलापूरमध्ये स्वीकृत सदस्य निवडीवरून शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद

CD

बदलापूर, ता. १० (बातमीदार) : बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत सदस्य निवडीवरून शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या हेमंत चतुरे यांना स्वीकृत सदस्य पद देण्यात आले. त्यामुळे पक्षातील जुने व निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चतुरे यांचा अडीच हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. याशिवाय त्यांच्या पॅनेलमधील दुसऱ्या शिवसेना उमेदवारालाही पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत शिवसेनेसाठी कोणतेही ठोस योगदान नसताना आणि स्थानिक स्तरावर पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता त्यांना स्वीकृत सदस्य पद दिल्याने ‘ही निवड नेमकी कोणत्या अटी-शर्तींवर करण्यात आली?’ असा थेट सवाल नगरसेविका शीतल राऊत यांनी उपस्थित केला आहे. पक्षासाठी अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा स्वीकृत सदस्य पदासाठी विचार होणे अपेक्षित होते, अशी ठाम भूमिका राऊत यांनी मांडली.
काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सोबत घेऊन शिंदे गटात प्रवेश केलेले संजय जाधव, गेली तीन दशके पक्षासाठी कार्यरत असलेले प्रकाश मरगज, मुकुंद भोईर, तसेच बहुजन समाजातील लोकप्रिय नेते प्रवीण राऊत यांच्यापैकी किमान एका नावाचा विचार व्हायला हवा होता; मात्र तसे न करता चुकीचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. बहुजन समाजातील लोकप्रिय नेतृत्व असलेल्या प्रवीण राऊत यांच्या नावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत व्यक्त करत, दिवंगत माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली. गटनेते श्रीधर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही राऊत कुटुंबीयांनी केली आहे. या घडामोडींमुळे बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली

SCROLL FOR NEXT